शेकडो महिलांसह पुरुष ‘निळे निशाण’ संघटनेत दाखल

0
54

संघटनेच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून संघटनेत केला प्रवेश

साईमत/यावल/प्रतिनिधी :

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात ‘निळे निशाण’ संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी प्रवेश सोहळा आयोजित केला होता. प्रवेश सोहळ्यात यावल तालुक्यातील शेकडो महिलांसह पुरुषांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मान्यवर कांशिरामजी यांच्या नेतृत्वात कार्यरत असलेल्या ‘निळे निशाण’ संघटनेच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून संघटनेत प्रवेश केला.

याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष विलास बोरीकर, सदाशिव निकम, जिल्हा सचिव शरद बाविस्कर, ॲड.प्रवीण इंगळे, फैजपूर विभागाचे उपाध्यक्ष अनिल इंधाटे, इकबाल तडवी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी यावल तालुकाध्यक्ष विलास तायडे, यावल तालुका युवक अध्यक्ष सागर तायडे यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here