साईमत, चोपडा : प्रतिनिधी
येथील रोटरी क्लब ऑफ चोपडातर्फे आयोजित रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० मधील रोटरी क्लबच्या सदस्यांसाठी आयोजित ‘मेंबरशिप अँड न्यू जनरेशन सेमिनार’ उत्साहात पार पडले. येथील डॉ. सुरेशदादा पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित सेमिनारचे उद्घाटन रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे माजी प्रांतपाल डॉ. आनंद झुनझुनवाला, माजी प्रांतपाल तथा फोरम लीडर राजीव शर्मा, महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील, रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे सह प्रांतपाल डॉ. राहुल मयूर, सचिव रश्मी शर्मा, रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष चेतन टाटिया, सचिव अर्पित अग्रवाल, निमंत्रक नितीन अहिरराव, सहनिमंत्रक नितीन जैन यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन, प्रतिमा पूजन केले.
याप्रसंगी राजीव शर्मा, ॲड. संदीप पाटील, डॉ. आनंद झुनझुनवाला यांनी मार्गदर्शनपर मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी राजीव शर्मा, डॉ संदीप देशमुख, डॉ. राहुल मयूर, डॉ. गोविंद मंत्री, डॉ. वैजयंती पाध्ये, डॉ. राजेश पाटील, लक्ष्मीकांत मणियार, डॉ आनंद झुनझुनवाला यांनी रोटरी सदस्य नोंदणी व वाढ, रोटरी क्लबची स्थापना, सदस्यांची जाणीव जागृती या संदर्भातील विविध विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन शंका समाधान केले.
विविध रोटरी सदस्यांची उपस्थिती
सेमिनारसाठी जळगाव, भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, चोपडा यासह विविध क्लबमधील रोटरी सदस्यांची उपस्थिती होती. सेमिनारनंतर क्षेत्रभेटी अंतर्गत येथील शिवकृपा कॉटस्पिन सूतगिरणीस भेट देऊन तेथील प्रकल्पाची माहिती घेण्यात आली. सूत्रसंचालन संजय बारी, स्वागतपर भाषण चेतन टाटीया, प्रास्ताविक नितीन अहिरराव तर आभार अर्पित अग्रवाल, रश्मी शर्मा यांनी मानले.