Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»टाटा मुंबई मॅरेथॉन मध्ये धावले जळगाव रनर्स ग्रुपचे सदस्य
    क्रीडा

    टाटा मुंबई मॅरेथॉन मध्ये धावले जळगाव रनर्स ग्रुपचे सदस्य

    SaimatBy SaimatJanuary 24, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    जळगाव रनर्स ग्रुपच्या किमान ६० सदस्यांनी गेल्या दोन महिन्यापासून टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी जळगाव शहर ,बहिणाबाई विद्यापीठ ,मेहरूण तलाव ट्रॅक याठिकाणी दररोज रनिंगचा सराव केला तसेच या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी किमान ३ ते ४ महिन्यापूर्वी नोंदणी आवश्यक असते टाटा मुंबई मॅरेथॉन जगातील नामांकित मॅरेथॉनपैकी एक आहे.यात यावर्षी ५५ हजार स्पर्धक जगभरातून सहभागी झाले होते त्याचाच एक भाग म्हणून जळगाव रनर्स ग्रुपचे ५० पुरुष व १० महिला यांनी यात सहभाग नोंदविला. यापैकी 40 जण हे पहिल्यांदा टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये धावले. ४२ किलोमीटर फुल मॅरेथॉन तसेच २१ .किलोमीटर मॅरेथॉन मध्ये यशस्वी सहभाग नोंदविला.

    जास्तीत जास्त वेगाने धावत स्पर्धा पूर्ण करणे हे खरोखर आव्हानात्मक आहे.असा आत्मविश्वास आपल्यात असणे जरुरीचे आहे. आठ आठवडे आधी जळगाव शहरात व त्या वातावरणात शारीरिक कष्टाचा सराव तर केलाच पण मुंबई टाटा मॅरेथॉन नतर पुढील मॅरेथॉनचे मानसिक आव्हान पेलण्यासही समर्थ झालो.यात एक वैशिष्ठये असे होते कि जळगावच्या वैशाली बडगुजर या महिलेने चक्क साडी घालून २१ किलोमीटर मॅरेथॉन पूर्ण केली असे प्रतिपादन गुरुप्रसाद तोतला व किरण बच्छाव यांनी सांगितले.

    उत्कृष्ट आयोजनासाठी देखील ही मॅरेथॉन संस्मरणीय ठरलीय कारण वाटेत ठिकठिकाणी मार्गदर्शक फलक, दर सुमारे 3 किमीनंतर पाण्याचे ठिकाण, इतर पोषक पेये, केळी, इत्यादींची व्यवस्था चोख होती. वाटेतील मुंबईकर नागरिक आदी अनेक व्यक्ती आनंदाने टाळ्या वाजवत धावपटूंचा उत्साह वाढवत होते आयोजकांचेही सर्व धावपटूंवर लक्ष्य होते व आवश्यक ती वैद्यकीय मदतही पुरवली जात होती. याशिवाय स्थानिक पोलीस प्रशासन व मुंबई मनपा व टाटा सन्स चे कर्मचारी ,अधिकारी देखील धावपटूंना विशेष प्रोत्साहित करीत होते व त्यांनी कायदा व सुव्यवस्था अतिशय चोखपणे बजावली असे सर्व धावपटूंनी सांगितले.
    यशस्वी सर्व धावपटूंचे जळगाव रनर्स ग्रुपचे अध्यक्ष किरण बच्छाव, डॉ. प्रशांत देशमुख , डॉ.विवेक पाटील , विक्रांत सराफ , अविनाश काबरा , निलेश भांडारकर, डॉ.राहुल महाजन, उमेश महाजन , डॉ. रवी हिरानी यांनी अभिनंदन केले

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon:जळगावात ८ मार्चला भव्य रक्तदान शिबिर

    March 7, 2026

    Muktainagar: मुक्ताईनगरची कन्या मोहिनी जगताप UPSC मध्ये मिळवते ऐतिहासिक यश

    March 7, 2026

    Jalgaon : जळगावच्या विद्यार्थ्याला ब्लॅकमेल करून तब्बल ५.९५ लाख उकळले

    March 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.