पोलीस, होमगार्ड यांच्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत सर्व जाती-धर्मातील स्री -पुरुष, सदस्यांनी दिला आपुलकीचा तगडा बंदोबस्त

0
47

यावल पोलिसांनी प्रथमच सुरू केली जातीय सलोख्याची उत्तम कौतुकास्पद प्रथा

साईमत/यावल/प्रतिनिधी :

यावल पोलीस स्टेशनच्या आवारात पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याने यावल पोलीस आणि होमगार्डच्या पथकाने श्री गणेशाची स्थापना केली होती. यावल शहरात पाचव्या दिवशी होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीत यावल पोलिसांनी यशस्वीपणे बंदोबस्त ठेवला होता. शासकीय कामकाज कर्तव्य आटोपल्यानंतर यावल पोलीस व होमगार्डच्या पथकाने स्थापन केलेल्या गणपती बाप्पाची बुधवारी, १८ रोजी सकाळी ११ वाजता गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक सर्व जाती-धर्मातील नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साह, शांततेत यावल पोलीस कार्यालयाच्या आवारातून पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांसह होमगार्ड पथकाने काढली. त्यात यावल शहरातील सर्व स्तरातील, सर्व जाती-धर्मातील नागरिक स्त्री-पुरुषांनी, शांतता कमिटी सदस्यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन नागरिक, समाजसेवक म्हणून मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन तगडा बंदोबस्त ठेवला. ही विसर्जन मिरवणूक पोलिसांनी उत्साहासह शांततेत पार पाडली.

मिरवणुकीत सर्व जाती-धर्मातील नागरिकांच्या भावनांचा आदर ठेवत गुलाल न उधळता फुलांची उधळण करण्यात आली. विसर्जन मिरवणुकीत मात्र पोलिसांची भूमिका नागरिक सदस्यांनी स्वतःहून स्विकारत पोलिसांच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत नागरिक म्हणून उपस्थिती देऊन तगडा बंदोबस्त ठेवला. त्यात पोलिसांचा मोठा उत्साह, जातीय सलोखा दिसून आला. पोलिसांचा गणेशोत्सव गणेश विसर्जन मिरवणूक नवीन प्रथा पायंडा म्हणून सर्वत्र कौतुकास्पद ठरला आहे.

नागरिकांनी राखला जातीय सलोखा

यावल शहरातून दरवर्षी किमान एक गणेशोत्सव किंवा एक दुर्गोत्सव मंडळ सर्व जाती-धर्मातील नागरिकांच्या सहभागाने स्थापन करून आपण स्वतः नागरिक म्हणून तगडा बंदोबस्त राखत (पोलिसांचा बंदोबस्त न घेता) उत्सव शांततेत मोठ्या उत्साहात साजरे करून शासनाला समाजाला जातीय सलोखा कसा राखावा. हे आपल्या समाज, जनता, राजकारणाला दाखवून द्यायला पाहिजे, असाही यामुळे चर्चेचा सूर उमटत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here