Mehrun area: मेहरुण परिसर : मालक समजून कर्मचाऱ्याला चौघांकडून मारहाण

0
9

एमआयडीसी पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

शहरातील मेहरूण परिसरात पेट्रोल टाकण्याच्या कारणावरून पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मालक समजून चार जणांनी शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच त्याला दमदाटी केली. हा प्रकार गुरूवारी, २२ मे रोजी दुपारी २ वाजता घडला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांवरून गुन्हा दाखल केला आहे.

जळगाव शहरातील मेहरुण परिसरातील विशाल हॉटेल पेट्रोल पंपावर संजय नामदेव ढेकणे (वय ५४) हे कामाला आहे. २२ मे रोजी पहाटेच्या सुमारास दोन दुचाकींवर शिवम सुनील शिंदे, शरद अशोक पाटील, कुणाल पाटील आणि शेखर (पूर्ण नाव माहित नाही) हे चार जण आले होते. त्यावेळी संजय ढेकणे हे पेट्रोलपंपाजवळ कामावर होते. त्यावेळी चौघांनी संजय ढेकणे यांना पेट्रोल पंपाचे मालक समजून पेट्रोल भरण्याच्या कारणावरून मारहाण करून दमदाटी केली.

दरम्यान, याप्रकरणी ढेकळे यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.कॉ. संजीव मोरे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here