मुक्ताईनगरला मानव अधिकार, महिला अपराध नियंत्रण संघटनेची बैठक

0
34

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी

मुक्ताईनगरला प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानव अधिकार, महिला अपराध नियंत्रण संघटना (नवी दिल्ली रजिस्टर भारत सरकार) तालुका शाखेच्यावतीने नुकतीच कार्यकारिणीची बैठक कार्याध्यक्ष बी.डी . गवई यांच्या निवासस्थानी झाली. अध्यक्षस्थानी अधीक्षक मोहन मेढे होते. यावेळी संस्थापक अध्यक्ष दिलीप मोहिते, संघटनेचे उपाध्यक्ष जगन्नाथ चांगदेवकर, कार्याध्यक्ष बी. डी. गवई उपस्थित होते.

याप्रसंगी तालुका अधीक्षक मोहन मेढे यांनी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा परिचय करून दिला. मोहिते आपल्या संघटनेवर असलेले प्रेम आणि समाजसेवेचा कार्याचा गौरव केला. मानव अधिकार संघटनेची कार्यप्रणाली समजावून सांगितली. महिला कार्यकारिणीही लवकरच जाहीर करण्यात येईल, असे पदाधिकाऱ्यांना सुचित केले. यावेळी तालुकाध्यक्ष भास्कर मिस्तरी, कार्याध्यक्ष बी.डी.गवई, उपाध्यक्ष जगन्नाथ चांगदेवकर यांनी मनोगत व्यक्त केले. त्यात म्हणाले की, मुक्ताईनगर तालुक्यात संघटनेच्या माध्यमातून मानवाचे अधिकार व नागरिकांची सनद याविषयी सविस्तर माहिती देऊन न्याय व हक्कापासून कोणीही वंचित राहणार नाही. तसेच अंध, अपंग, दिव्यांग बांधवांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना योग्य शासकीय योजनांचा लाभ देण्यात येईल, असे सांगितले.

याप्रसंगी संपर्क अधिकारी रामदास मिस्तरी, विजय खराटे, सचिव हकीम चौधरी, संघटक धनंजय सापधरे, उपसचिव पंकज वंजारी, संघटक चंद्रकांत रावाये उपस्थित होते. सूत्रसंचालन तथा आभार तालुकाध्यक्ष भास्कर मिस्तरी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here