साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील तळेगावसह शिरसगावला सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा आरक्षणासाठी गुणवंत शेलार आणि दिलीप पाटील हे उपोषणाला बसले आहेत. तालुक्यातील तळेगाव, शिरसगाव येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणस्थळी गुरुवारी, २६ ऑक्टोबर रोजी दुसऱ्या दिवशी राज्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भेट दिली.
तळेगावला ते म्हणाले की, राज्य सरकार मराठा समाजाची फसवणूक करत आहे. शासनाने तात्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे सांगत मराठा आरक्षणाला माझा जाहीर पाठिंबा असल्याचे सांगितले.
याप्रसंगी जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, मा.जि.प.सदस्य अतुल देशमुख, शशिकांत साळुंखे, भूषण पाटील, माजी सैनिक विकास पाटील तर तळेगावचे कल्याणराव देशमुख, तुषार देशमुख, कैलास शेलार, सतीश देशमुख, प्रवीण शेलार, महेंद्र शेलार, शामकांत शेलार, सुनील देशमुख, निळकंठ देशमुख, संजय देशमुख, राजेंद्र शितोळे, उमेश भोसले, सुदाम गोरे, नरेंद्र देशमुख यांच्यासह मराठा समाजाचे बांधव उपस्थित होते.