साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
स्वराज्य पक्षाच्या बांधणीसाठी पाचोरा येथे नुकतीच स्वराज्य पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष केशव गोसावी यांनी सामाजिक कार्यकर्ते गणेश पाटील, रमाकांत पवार, डॉ.योगेश पाटील यांच्यासह चाळीसगाव येथील रयत सेनेचे संस्थापक-अध्यक्ष गणेश पवार यांची भेट घेऊन स्वराज्य पक्षाच्या ध्येय धोरणाविषयी चर्चा केली.
स्वराज्य पक्ष प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांचे महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, सर्व सामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी स्वराज्य पक्षाच्यावतीने कार्य सुरू आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात स्वराज्य पक्षाचे काम वाढविण्यासाठी आपण नव्या उमेदीचे कार्यकर्ते तयार करून जळगाव जिल्ह्यात स्वराज्य पक्षाचे काम वाढविण्यासाठी कामाला लागून संभाजीराजे छत्रपती यांचे हात बळकट करण्याचे आवाहन केले. केशव गोसावी यांच्या हजरजबाबीपणा आमच्या मनात घर करून गेला असल्याने उपस्थित सर्वांनी स्वराज्य पक्ष वाढविण्यासाठी जिल्हा पिंजून काढणार असल्याचे सांगितले. स्वराज्य पक्षाचा विस्तार करण्यासाठी कामाला लागणार आहोत, असा शब्द त्यांना बैठकीत दिला. याप्रसंगी चेतन पाटील आदी उपस्थित होते.
चाळीसगाव शहरासह तालुक्यात ज्या बांधवांना स्वराज्य पक्षात काम करण्याची इच्छा असेल त्यांनी गणेश पवार (मो.९८२२७४१४२६) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन केले आहे.