बोदवडातील कार्यक्रमात डाॅ. बी.के.प्रमोद आपटे यांचे प्रतिपादन
साईमत/बोदवड/प्रतिनिधी :
ध्यानाच्या माध्यमातून विविध आजारापासून मुक्ती मिळते. स्वत आठ-आठ तास ध्यान करुन व्याधीपासून कशी सुटका झाली. त्याचा अनुभव डाॅ. बी.के.प्रमोद आपटे यांनी सांगितला. कर्माचे फळ हे भोगावेच लागते. परंतु नियमित ध्यान केले. शिवबाबांची मुरली जर ऐकली तर दु:खापासून व्याधीपासून मुक्ती मिळते. मी कोण आहे काय करीत आहेत. माझे कर्तव्य काय त्याचे स्मरण वेळोवेळी करावे, आज प्रजापती ब्रम्हकुमारीज माऊंट अबु केंद्राद्वारे नियमित शिबिरे चालतात. ते शिबिरे जीवनात सकारात्मक बदल येण्यासाठी करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
बोदवड येथील बाळासाहेब ठाकरे नगर येथील प्रजापिता ब्रम्हकुमारी केंद्रावर मर्जिवा भोग कार्यक्रम झाला. कार्यक्रमात डाॅ.प्रमोद आपटे ठाणा यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. स्वतचा वैद्यकीय व्यवसाय सोडून गेल्या २५वर्षापासून ते अखिल विश्व ब्रम्हकुमारीज सेंटर सेवा करीत आहे. वयाच्या ७२ व्या वर्षी कोणतीही व्याधी नाही.
कार्यक्रमाला बी.के.प्रणिता दीदी, मुंबई, बी.के. निता दीदी धरणगाव, बी.के.सुशिला दीदी, पहुर, बी.के. अश्विनी दीदी, बोदवड यांचे मार्गदर्शन मिळाले. यावेळी संजय माळी यांच्यातर्फे ब्रम्हभोज (शिवबाबा का भंडारा) कार्यक्रम ठेवण्यात आला होता.