Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»वरणगाव»Medical Superintendent : वैद्यकीय अधीक्षकांनी स्वतः रुग्णवाहिका चालवून दिला सेवानिवृत्त चालकाला निरोप
    वरणगाव

    Medical Superintendent : वैद्यकीय अधीक्षकांनी स्वतः रुग्णवाहिका चालवून दिला सेवानिवृत्त चालकाला निरोप

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 2, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे रुग्णवाहिका चालक, कक्षसेवक झाले सेवानिवृत्त

    साईमत/वरणगाव/प्रतिनिधी

    वरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे रुग्णवाहिका चालक व कक्ष सेवक अशा दोघांचाही शनिवारी सेवानिवृत्तीनिमित्त निरोप समारंभ पार पडला. त्यानंतर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन अहिरे यांनी स्वतः रुग्णवाहिका चालवत सेवानिवृत्त रुग्णवाहिका चालक, कक्षसेवक यांना रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत निरोप दिला. यावेळी रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. वरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे रुग्णवाहिका चालक व कास्ट्राईब संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मिलींद मुरलीधर मेढे तसेच कक्ष सेवक संजय भास्कर पाटील हे आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर शनिवारी, ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त रुग्णालयात त्यांचा वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली निरोप समारंभ आयोजित केला होता.

    याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, नगर परिषदेचे माजी गटनेते राजेंद्र चौधरी, उपनगराध्यक्ष शेख अखलाख, साजीद कुरेशी, जिल्हा सामान्य रुग्णालय सरकारी कर्मचारी पतसंस्थेचे विभागीय अध्यक्ष तसेच कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दोन्ही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी बजावलेल्या रुग्ण सेवेबद्दल उपस्थित मान्यवरांनी गौरवोद्गार व समाधान व्यक्त करत त्यांचा शाल, श्रीफळ देवून सन्मान केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सचिन अहिरे यांनी दोन्ही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रुग्णवाहिकेत बसवून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहचवून निरोप दिला. यावेळी रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी भावनिक होवून मानवी साखळी तयार केली होती.

    यांची होती उपस्थिती

    कार्यक्रमाला डॉ. रोहीत सपकाळे, डॉ. रुपेश उगले, डॉ. गिरीष उगले, किशोर तायडे, प्रवीण पाटील, प्रमोद पाटील, उदय बोंडे, जनार्दन वाघ, इरफान पटवे, आत्माराम नागरूत, संगीता हडाके, शितल बोदडे, पल्लवी सुरवाडे, मोहिनी सपकाळे, भावना प्रजापती, निता भालेराव, सुजाता कोल्हे, आकाश इंगळे, महेंद्र सोनवणे, मनोज तायडे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन तथा आभार ज्योती गुरव यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Nageshwar Temple : नागेश्वर मंदिर संस्थेच्या जागेचा वाद चव्हाट्यावर

    May 30, 2025

    30 thousand surgeries : डॉ. नि. तु. पाटील यांचा ३० हजार मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा विक्रम

    April 23, 2025

    जिल्हा बँकेकडून 31 मार्चपूर्वी कर्जफेडीवर शून्य व्याज

    March 26, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.