साईमत अक्कलकुवा प्रतिनिधी
आर. एफ. एन.एस. वरिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने वैद्यकीय तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिराच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. सी. पी. सावंत यांनी डॉ. भूषण कुलकर्णी यांच्या सत्कार केला आणि त्यानंतर आरोग्य हे जीवनात किती महत्त्वाचे असून त्याची कशा पद्धतीने राखण केली पाहिजे याबाबतीत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिबिरास लाभलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे रक्तदाब, उंची,वजन आणि नाडीचे ठोके तपासले.
शिबिरास प्रथम वर्ष विज्ञान वर्गातील ५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. विजय पाटील, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. राजेश्वरसिंग पाडवी, रासेयो सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अंकुश खोब्रागडे, प्रा. गोपाल शेंडे, प्रा. डॉ. मनोज मुधोळकर, प्रा. डॉ. मोहम्मद जुबेर शेख, प्रा. डॉ. योगेश दुशिंग, प्रा. डॉ. विनोद जोगदंड, प्रा. गोटू सूर्यवंशी, प्रा. विनीश चंद्रन उपस्थित होते.
शिबिराचे सूत्रसंचालन आणि आभार व्यक्त विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. भरत पाटील यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी योगेश महाजन, जगदीश पटेल, कांतिलाल पाटील, मनीष पाटील, नारायण पाटील,भरत साळवे, अंकुश ठाकरे, प्रशांत पिंपरे, दिनेश ईशी आणि भगवान पाटील यांचे सहकार्य लाभले.