जळगावात आजपासून महापौर संगीत महोत्सव सुरू

0
15

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी 

ऑर्केस्ट्रा कलाकार असोसिएशन आयोजित “ महापौर संगीत महोत्सव आज 13 ऑगस्टपासून सुरू होत आहे. 15 ऑगस्टपर्यन्त हा महोत्सव चालणार आहे.भव्य-दिव्य स्वरूपात हा संगीत उत्सव साजरा होणार आहे.
महोत्सवाच्या उदघाटनाला महापौर जयश्रीताई महाजन ,खासदार उन्मेष पाटील,मनपाच्या आयुक्त विद्या गायकवाड ,गटनेते सुनिल महाजन, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा व.वा.वाचनालयाचे कार्याध्यक्ष ॲड.प्रताप निकम,शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे,ऑर्केस्ट्रा कलाकार असोसिएशनचे अध्यक्ष व आयोजक ज्येष्ठ कलावंत मोहन तायडे,सचिव तुषार वाघुळदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यातील कलावंतांना कोरोना महामारीमुळे आपली कला सादर करण्याची त्यांना संधी मिळाली नव्हती तसेच नृत्य,गायक ,वादक यासह इतर कलाकारांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी महापौर संगीत महोत्सव होत आहे.
या महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असल्याचे असल्याचे आयोजक व संस्थेचे अध्यक्ष मोहन तायडे व सचिव तुषार वाघुळदे यांनी कळविले आहे.
जळगावकरांना नाविन्यपूर्ण उपक्रम बघता यावे ,रसिकांची गरज पूर्ण व्हावी ,त्यांना उत्तमोत्तम कार्यक्रमाची मेजवानी मिळावी यासाठी हा “ महापौर सांस्कृतिक महोत्सव “ घेण्यामागचा प्रामाणिक प्रयत्न आहे असे तुषार वाघुळदे यांनी सांगितले.

या ऐतिहासिक संगीत महोत्सवात दि.13 ऑगस्ट रोजी शनिवारी सकाळी 10:30 वाजता व.वा.वाचनालय,रेल्वे स्टेशन रोड येथील नवीन सभागृहात सोलो डान्स ( 12 वर्षाखालील मुले / मुली ) , सोलो डान्स 13 वर्षांखालील मुले / मुली तसेच समूह नृत्य स्पर्धा ( ग्रुप डान्स ) खुला गट अशा स्पर्धा होतील..सायंकाळी 6 वाजता ( ब्लॅक अँड व्हाईट ) चित्रपटातील गाण्यांचा बहारदार कार्यक्रम होईल. स्थळ व.वा.वाचनालयाचे नवीन सभागृह असेल.
दि.14 ऑगस्ट रविवार रोजी व.वा.वाचनालय रेल्वे स्टेशन रोड येथील नवीन सभागृहात सकाळी 10:30 वाजता द ग्रेट मॉम ( महिलांसाठी नृत्य स्पर्धा ,दुपारी गीतगायन स्पर्धा खुला गट ( करावोके ) स्पर्धा होतील .याच दिवशी दि.14 रोजी सायंकाळी 6 वाजता भारतरत्न गानकोकीळा स्व.लता मंगेशकर यांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम होईल.
दि.15 ऑगस्ट सोमवारी सकाळी 11 वाजता “ आझादी का अमृत महोत्सव “ या कार्यक्रमाअंतर्गत देशभक्तीपर गीतगायन कार्यक्रम होणार आहे,हा देखणा कार्यक्रम (पान 2 वर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here