Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Jalgaon : बी.जे. मार्केटमध्ये महापौर दीपमाला काळे यांचा स्वच्छता व सुधारणा अभियान
    जळगाव

    Jalgaon : बी.जे. मार्केटमध्ये महापौर दीपमाला काळे यांचा स्वच्छता व सुधारणा अभियान

    saimatBy saimatApril 3, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ‘माझं जळगाव, स्वच्छ जळगाव’ संकल्पनेतून मोहीम यशस्वी

    साईमत /जळगाव / प्रतिनिधी

    शहराच्या मध्यवर्ती बी.जे. मार्केटमध्ये गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्वच्छता, अतिक्रमण आणि पायाभूत सुविधा समस्यांवर महापौर दीपमाला काळे यांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. ‘माझं जळगाव, स्वच्छ जळगाव’ या संकल्पनेअंतर्गत गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांत विशेष स्वच्छता मोहीम राबवून मार्केट परिसराला नवजीवन दिले गेले आहे.

    महापौरांच्या आदेशानंतर आरोग्य विभागाने २ आणि ३ एप्रिल रोजी मार्केटमधील प्रसाधनगृहांची संपूर्ण स्वच्छता केली. तसेच, कर्तव्यपाळू ठेकेदारास ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

    स्वच्छतेसोबतच अतिक्रमण निर्मूलन आणि पायाभूत सुविधा सुधारण्यावरही भर देण्यात आला. अतिक्रमण विभागाने अनधिकृत अडथळे हटवून परिसर मोकळा केला, तर विद्युत विभागाने पथदिव्यांची पाहणी करून नवीन दिवे बसवण्याचे काम सुरू केले. तुटलेले रेलिंग आणि किरकोळ बांधकामांची पाहणी बांधकाम विभागाने केली असून, पुढील १५ दिवसांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.

    शुक्रवारी सकाळी महापौर दीपमाला काळे स्वतः मार्केटमध्ये जाऊन कामांची पाहणी केली. साचणाऱ्या पाण्याबाबत आणि प्रसाधनगृहांच्या गळतीबाबत त्यांनी तीव्र संताप व्यक्त करून संबंधित विभागांना तात्काळ दुरुस्त्या करण्याचे कडक आदेश दिले.

    मार्केट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रलंबित समस्या मार्गी लागल्याबद्दल महापौरांचे आभार मानले. मोहीम आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी रमेश कांबळे, रुपेश भालेराव, मुकेश पाटील, मयूर सपकाळे, मुकादम विशाल चांगरे, बीव्हीजी सुपरवायझर संदीप शर्मा आणि गणेश कोळी यांच्या टीमने यशस्वीपणे राबवली.

    महापौरांच्या पुढाकारामुळे मार्केटचा चेहरामोहरा बदलत असून, व्यापाऱ्यांनीही महापालिकेस सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon : गिरीश महाजनांचा संजय राऊत, एकनाथ खडसे आणि जमीन प्रकरणांवर थेट प्रतिक्रिया

    April 3, 2026

    Sanjay Raut : राऊताचा दावा: शिंदे व अजित पवार गटाचे काही आमदार भविष्यात भाजपमध्ये जाऊ शकतात

    April 3, 2026

    असामान्य हवामानामुळे रुग्णसंख्या वाढली; नागरिक सावधगिरी बाळगावी

    April 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.