अल्लाह रहमत की बारिश बरसा..

0
5

साईमत जळगाव प्रतिनिधी

राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दडी मारल्याने कोरडया दुष्काळा सारखी भयावह स्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी पाऊस पडावा म्हणून सर्व शक्तिमान, निसर्ग चालवणारी शक्ती म्हणजे एकमेव ईश्वर – अल्लाह यांना साकडे घालण्यासाठी जळगाव शहरातील हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन नमाज ए ईस्तेस्का अदा करून दुआ केली.

मौलाना उस्मान कासमी यांनी खास दुवा करत अल्लाह ला साकडे घातले की, आमच्याकडून झालेल्या चुका माफ कर, आम्ही कोणाचेही हक्कावर गदा आणणार नाही, एकमेका सहाय्य करू, कोणाची चेष्टा करणार नाही परंतु तू पाऊस दे अशी प्रार्थना करीत असताना उपस्थित हजारोच्या संख्येने उपस्थित समुदायाने आपले दोघी हात उलटे करून दुवा मागितली.
उलटे हात करून दुआ या साठी केली की, जे काही संकट आमच्यावर आलेल्या आहेत ती संकट उलथून टाक म्हणून दोन्ही हात उलटे करून दुवा करण्यात आली.उलमा कौन्सिल जळगाव व मुस्लिम इदगाह व कब्रस्तान ट्रस्ट जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या नमाज व दुआ चे आयोजन शहरातील ईदगाह मैदानावर करण्यात आले होते. सर्वप्रथम मुफ्ती सलिक सलमान यांनी या नमाज चे वैशिष्ट्ये विशद केले. अरबी प्रवचन मुफ्ती अतीक यांनी सादर केले. मौलाना उस्मान कासमी यांनी नमाज अदा करून दुवा केली.
या वेळी उल्मा तर्फे मुफ्ती अफजल, ईदगाह ट्रस्ट चे अध्यक्ष वहाब मलिक, जनरल सेक्रेटरी फारुक शेख, सचिव अनिस शाह, मोहसीन सैयद, आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here