Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चोपडा»अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ मविआचा निषेध मोर्चा
    चोपडा

    अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ मविआचा निषेध मोर्चा

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 9, 2024Updated:September 9, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपड्यात मविआतर्फे तहसिलदारांना निवेदन सादर

    साईमत/चोपडा /प्रतिनिधी :

    तालुक्यातील विरवाडे येथे तेरा वर्षाच्या आदिवासी अल्पवयीन मुलीवर नराधमाने अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या केली होती. त्या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी, ९ सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीच्यावतीने शासकीय विश्रामगृहापासून ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार जगदीशचंद्र वळवी, डॉ.चंद्रकांत बारेला, चोपडा साखर कारखानाचे माजी चेअरमन घन:शाम पाटील, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, देवेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष शशीकांत पाटील, ओबीसी सेलचे किशोर दुसाने, गोकुळ पाटील, गोपाल पाटील, महिला जिल्हाध्यक्ष ज्योती पावरा यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्यावतीने तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले. अत्याचार करणाऱ्या नराधमाला त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली.

    यावेळी शिवसेना उबाठा गटाच्या रोहिणी पाटील, नगरसेवक हितेंद्र देशमुख, नुमान काजी, अकिल जहागीरदार, हुसेन पठाण, असिफ सय्यद, भाऊसाहेब साळुंखे, आनंदराव रायसिंग यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    चिमुरडीवर अत्याचार करून निर्दयीपणे तिची हत्या केल्याचे अमानवीय कृत्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या महाविकास आघाडीने प्रतिक्रिया देत गुन्ह्याचा खटला जलद न्यायालयात जलद गतीने चालवून आरोपीस कुठलीही दया न दाखविता फाशीचीच शिक्षा व्हावी.

    – जगदीशचंद्र वळवी, माजी आमदार

    जिल्ह्यातील महिलांची सुरक्षेची हमी कोण घेणार? लाडकी बहीण योजना बंद करा, सुरक्षित बहीण योजना सुरू करा. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. प्रशासनावर कोणताही दबदबा राहिलेला नाही. त्यामुळे महिलांवर अत्याचार वाढत आहेत.

    -ज्योतीताई पावरा, महिला जिल्हाध्यक्ष

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chop : ट्रॅक्टर अपघातात बाप-लेकाची एकाच दिवसात शोकांतिका

    February 7, 2026

    Chop : चोपड्यातील वाहतूक हवालदार निलंबित

    January 31, 2026

    chop : माहेरी आलेल्या महिलेची विहिरीत उडी दोन मुलांसह मृत्यू

    January 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.