न.पा.समोरील जिजामाता चौकात कार्यकर्त्यांनी फोडले फटाके
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
येथील नगरपालिकेसमोरील जिजामाता चौकात शासनाने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्यामुळे सोमवारी, ३० जून रोजी दुपारी जामनेर तालुका महाविकास आघाडी तसेच मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप खोडपे, डी.के.पाटील, किशोर पाटील, सचिन बोरसे, विश्वजीत पाटील, प्रल्हाद बोरसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाधिकारी डॉ.विजयानंद कुलकर्णी, तालुकाध्यक्ष अशोक पाटील, शिवसेना उबाठाचे सुकलाल बारी, ॲड.प्रकाश पाटील, माजी शहरप्रमुख सुधाकर सराफ, शहर संघटक उस्मान शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, संदीप मराठे, सागर जोशी, राहुल शिंदे, कुलवंत शिंदे, नंदू इंगळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश झाल्टे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.