साईमत जळगाव प्रतिनिधी
विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये दिनांक १४ फेब्रुवारी रोजी मातृ पितृ पूजन दिन साजरा करण्यात आला.
“मातृ पितृ उपासना दिवस” साजरा करण्यासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.इयत्ता 5 वी च्या विद्यार्थ्यांनी यावेळी त्यांचे विचार मांडले. चैताली पाटील आणि सिमरन बारी या विद्यार्थिनींनी आपल्या जीवनातील पालकांचे महत्व या विषयावर भाषण केले.
प्राचार्य प्रवीण सोनवणे यांना सक्रिय सहभाग पाहून आणि तरुण पिढीची “पालक” बद्दलची काळजी ऐकून खूप समाधान वाटले.सर्व विद्यार्थ्यांना एक छोटी व्हिडिओ क्लिपही दाखवण्यात आली. शाळेतील उपस्थित शिक्षक, शिक्षिकेच्या मुलांच्या हस्ते त्यांचे पूजन करण्यात आले. प्राथमिक विभागाच्या समन्वयिका अनघा साघडे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम प्रमुख अनिल कोथळकर, भूषण खंबायत हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खुशी वाणी या विद्यार्थिनीने केले. आभार प्रदर्शन कुलश्री कुलकर्णी या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.