शिवराय प्रतिष्ठान महिला मंडळातर्फे दुर्गा सप्तशतीच्या पाठाचे सामूहिक वाचन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
शहरातील पिंप्राळा भागातील जिल्हा परिषदेच्या कॉलनीतील शिवराय प्रतिष्ठान महिला दुर्गा मंडळाच्यावतीने देवीची स्थापना केली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रीनिमित्त विविध उपक्रम राबवून दुर्गा सप्तशतीच्या पाठाचे सामूहिक वाचन करण्यात आले. पाठ वाचण्यासाठी परिसरातील सुमारे ३० महिलांनी सहभाग घेतला होता.
यशस्वीतेसाठी मंडळाच्या अध्यक्षा नीलू इंगळे, विकास मराठे, निलेश बडगुजर, आबा पाटील, योगिता शिरसाठ, प्रतिभा मराठे यांनी परिश्रम घेतले.