पिंपळगाव कमानी गावात पसरली शोककळा
साईमत/पहुर, ता.जामनेर/प्रतिनिधी :
गोंदेगाव तांडा येथून जवळील पिंपळगाव कमानी येथे रक्षाबंधन जवळ आल्याने विवाहिता पूजा काशिनाथ पवार (वय २१) ही आई-वडिलांकडे आली होती. शुक्रवारी, १६ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास विषारी सापाने पूजा पवार यांच्या उजव्या हाताच्या बोटाला चावा घेतला. त्यानंतर त्यांना काही वेळातच पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप पाटील यांनी पूजा यांना मयत घोषित केले.
गेल्या ३ वर्षांपूर्वी पुजाचे लग्न झाले होते. पुजाला दोन वर्षाचा चिमुकला मुलगा आहे. तिच्या अकस्मात मृत्यूमुळे पिंपळगाव कमानी गावात शोककळा पसरली आहे.