शहर पोलिसात पतीसह सासरच्या ५ जणांविरुध्द गुन्हा दाखल
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील इंद्रप्रस्थ नगरातील विवाहितेला हुंडा कमी दिला तसेच दुकान टाकण्यासाठी माहेरहून ५ लाख रूपयांची मागणी करत बामणोदला सासरी मारहाण करून छळ केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी रविवारी, ६ जुलै रोजी पतीसह सासरच्या मंडळींविरुध्द जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याचे सांगण्यात आले.
जळगाव शहरातील इंद्रप्रस्थ नगर येथील माहेर असलेल्या गायत्री देवेंद्र सोनवणे (वय २४) यांचा देवेंद्र बाळू सोनवणे यांच्याशी रितीरिवाजानुसार विवाह झाला आहे. दरम्यान लग्नात हुंडा कमी दिला तसेच पतीला किराणा दुकान टाकण्यासाठी पाच लाख रूपये आणावे, अशी मागणी करत विवाहितेला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. त्यानंतर सासू, सासरे, ननंद यांनी शारिरीक व मानसिक छळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्या त्रासाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आली. त्यानंतर तिने ६ जुलै रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
विवाहितेच्या तक्रारीनुसार पती देवेंद्र बाळू सोनवणे, सासू संगीता बाळू सोनवणे, चुलत सासरे राजेंद्र सदाशिव सोनवणे (तिन्ही रा. बामणोद ता. यावल), नणंद उज्ज्वला गोपाल तायडे आणि नंदोई भाई गोपाल ज्ञानेश्वर तायडे (रा. खामखेडा ता. मुक्ताईनगर)यांच्याविरुध्द जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.हे.कॉ. प्रफुल्ल धांडे करीत आहे.