मॅरेथॉन स्पर्धेत ६७ तरुणांनी नोंदविला सहभाग
साईमत/धानोरा, ता.चोपडा/प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनिमित्त मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन शासन स्तरावरून केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर झि.तो.महाजन माध्यमिक आणि ना.भा.पाटील ज्युनिअर कॉलेज, धानोरा विद्यालयात मुख्याध्यापक के.एन.जमादार, उपमुख्याध्यापक नवल महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नवमतदार व १८ वर्षावरील युवकांची मॅरेथॉन स्पर्धा धानोरा विद्यालयामार्फत आयोजित केली होती.
मतदार जनजागृती मॅरेथॉन रॅलीचे आयोजन विद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून जळगाव रस्त्यावरून यावल-चोपडा महामार्गाने मोहरद रस्त्यावरून पुढे करण्यात आले. उपमुख्याध्यापक नवल महाजन यांनी हिरवा झेंडा दाखवत मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात केली. स्पर्धेचे नियोजन क्रीडाशिक्षक देविदास महाजन यांनी केले. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये ६७ तरुणांनी सहभाग नोंदविला. त्यात प्रथम वैभव प्रवीण पाटील बीडगाव, द्वितीय गौरव प्रकाश माळी धानोरा, साई पंढरीनाथ पाटील चिंचोली, चतुर्थ गुणवंत लखीचंद पाटील धानोरा, पाचवा देवेश प्रवीण पाटील धानोरा, सहावा धनुष संभाजी पालवे किनगाव यांनी क्रमांक पटकावला. सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या क्रीडा विभागामार्फत बक्षीस देण्यात आले. विजयी स्पर्धक व आयोजन समितीच्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन विद्यालयाचे चेअरमन प्रदीप महाजन, शालेय समितीचे ज्येष्ठ संचालक बी.एस.महाजन, वामनराव महाजन, योगेश पाटील, सागर चौधरी, गटशिक्षणविस्तार अधिकारी कविता सुर्वे, केंद्रप्रमुख राकेश पाटील व ग्रामस्थांनी केले.
यावेळी क्रीडाशिक्षक देविदास महाजन, एस.एच.तडवी, सी.बी.सोनवणे, ए.पी.शिरसाठ, एस.एस.पाटील, डिगंबर सोनवणे, मच्छिंद्र महाजन, हिमांशू चौधरी यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. गावासह परिसरातील सर्व क्रीडाप्रेमी ग्रामस्थ, जागरूक नागरिकांनी विद्यालयाच्या मतदार जागृती मॅरेथॉन रॅलीचे कौतुक केले.