साईमत जळगाव प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळेच्या मराठी विभागातर्फे आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या अंतर्गत विद्यार्थ्यांचे कवी संमेलन झाले.
या कवी संमेलनात प्रज्ञा नांदेडकर, बाबुराव देसाई, निलेश चौरे, पवन वसावे, गौरव खराटे, अनुष्का पवार, अजय पवार, कवीता बोरसे, महेश सुर्यवंशी,कृष्णा संदानशीव, डॉ. सुदर्शन भवरे, नेत्रा उपाध्ये, डॉ. दीपक खरात, भारती सोनवणे यांनी कवीता सादर केल्या. डॉ. म.सु.पगारे यांनी अध्यक्षीय समारोप केला. डॉ. प्रिती सोनी यांनी आभार मानले.