सिग्नल यंत्रणा कार्यान्वित व्हावी म्हणून मुख्याधिकाऱ्यांना मराठा महासंघाचे निवेदन

0
27
सिग्नल यंत्रणा कार्यान्वित व्हावी म्हणून मुख्याधिकाऱ्यांना मराठा महासंघाचे निवेदन

साईमत चाळीसगाव प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज चौकात बंद पडलेली सिग्नल यंत्रणा कार्यान्वित व्हावी म्हणून मराठा महासंघाच्या वतीने दिनांक 30 जून 2023 रोजी चाळीसगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. मराठा महासंघाच्या मराठा महासंघाच्या निवेदनात म्हटले आहे की, चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज या चौकात यापूर्वी सिग्नल यंत्रणा सुरू होती ती अचानक बंद करण्यात आलेली आहे.

यापूर्वी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्हता मात्र आता महाराजांचा पुतळा झाल्याने ते एक आकर्षण स्थळ झाले आहे. वाहन चालक यांचे लक्ष पुतळ्याकडे जाते आणि आजूबाजूला मोठमोठे डिजिटल बॅनर लावले जात असल्याने एकाच वेळी सर्व वाहन जात येत असल्याने डिजिटल बॅनर कडे वाहन चालकांचे लक्ष जाते त्यामुळे लक्ष विचलित होऊन छोटे मोठे अपघात होत आहे. तसेच पायी चालणाऱ्या नागरिकांना मोठ्या कसरतीने रस्ते क्रॉस करावे लागतात.

या सर्व गंभीर बाबींचा विचार होऊन या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाली तर वाहने सुरळीतपणे जातील येतील व एकाच वेळी एकच मार्ग सुरू होईल व चौकात छोटे-मोठे अपघात होणार नाहीत नागरिकांना रस्ता क्रॉस करण्यात कसरत होणार नाही म्हणून लवकरात लवकर सिग्नल यंत्रणा सुरू करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल असे निवेदन मराठा महासंघाच्या वतीने चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे.

मराठा महासंघाच्या निवेदनावर चाळीसगाव शहराध्यक्ष खुशाल बिडे, उपाध्यक्ष कैलास पाटील, एडवोकेट निळकंठ पाटील, शिवसेना उद्धव गटाचे सुनील गायकवाड, सुभाष राठोड, शाहू मराठा विकास मंडळाचे नंदकिशोर पाटील, सुमित कापसे, सुनील पाटील, सुदाम शेलार आदी कार्यकर्त्यांच्या सह्या केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here