साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील नागद रस्त्यावरील अँग्लो उर्दू हायस्कूलजवळील नगरपालिका अंतर्गत बनविण्यात आलेल्या भुयारी गटार बनविल्यापासून त्यात मोटार सायकल स्वार तर कधी चार चाकी वाहने फसतांना दिसत आहे. या गटारीमुळे येथून रहदारी करणाऱ्या वाहनधारकांचा जीव धोक्यात आला आहे. या समस्यांबद्दल नगरपालिकामध्ये तक्रारीही या भागातील नागरिकांनी केल्या आहेत. मात्र, याकडे नगरपालिका लक्ष देत नाही, असे सामाजिक कार्येकर्ते आदिल चाऊस यांनी सांगितले. नगरपालिका कोणाचा जीव जाण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.