साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना नेते उमेश (पप्पूदादा) गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी, १७ फेब्रुवारी रोजी असंख्य शिवसैनिकांनी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख राहुल पाटील, गुणवंत शेलार, संजीव पाटील, सागर चौधरी, शुभम राठोड, साहेबराव काळे मनीषा महाजन, अनिता शिंदे, सुवर्णा राजपूत, कविता साळवे, सीमा पवार, रत्ना पाटील, सागर पाटील, महेंद्र पाटील, विशाल धनगर, दीपक बारी, दिनेश कासार उपस्थित होते.
यावेळी सोमा चौधरी, त्रिशुल गोसावी, अजय पाखरे, महेंद्र मसाळे, रोहित शिरसाट, रोहित पाटील, भूषण चौधरी, पवन चौधरी, गौरव चौधरी, प्रथमेश चौधरी, उज्ज्वल बाविस्कर, प्रमोद देशमुख, सुमित चौधरी, शैलेश बाविस्कर, विशाल कुमावत, आशुतोष पाटील, शकिल मुल्ला, शइमाईन मुल्ला, स्वप्निल अहिरे, निखिल बाविस्कर, भूषण महाले, विजय चौधरी, गौरव गायकवाड, बाळा निकम यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
भविष्यात उमेश गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगावच्या दिग्गज राजकीय नेत्यांचेही पक्षप्रवेश होणार आहेत. लवकरच मा.जि. प.सदस्य, मा.पं.समितीचे सदस्य, मा. नगरसेवकांचेही शिवसेनेत प्रवेश होणार आहेत.



