हस्तलिखित”बायोकेमिस्ट्री रॅपिड रिव्हिजन” पुस्तकाच्या तृतीय आवृत्तीचे प्रकाशन

0
92

साईमत /न्यूज नेटवर्क / जळगाव

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील जीवरसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेश जांभुळकर यांच्या हस्तलिखित छपाई असलेल्या “बायोकेमिस्ट्री रॅपिड रिव्हिजन” पुस्तकाचे नुकतेच अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
डॉक्टरांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले आणि हस्तलिखित पद्धतीचे, छपाई केलेले “बायोकेमिस्ट्री रॅपिड रिव्हिजन” महाराष्ट्रातील हे पहिलेच पुस्तक आहे. या पुस्तकाची तिसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे. दिल्ली येथील प्रसिद्ध जेपी ब्रदर्स मेडिकल पब्लिशर्स यांच्या पन्नास वर्षातील कारकीर्दीतील ही पहिलीच हस्तलिखित छपाई असलेले पुस्तक आहे.

जीवरसायनशास्त्र विषयाशी संबंधित व एमबीबीएसच्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सुटसुटीत आणि सोप्या भाषेत समजावे अशा विविध व्याख्यांसहित मार्गदर्शन या पुस्तकांमध्ये करण्यात आले आहे. आतापर्यंत दोन आवृत्ती विक्रमी संपले असून तिसरी आवृत्तीचे नुकतेच अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. डॉ. राजेश जांभुळकर हे जीवरसायनशास्त्र विभागाचे सहयोगी प्रा. व विभाग प्रमुख आहेत. प्रकाशनावेळी उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, डॉ. किशोर इंगोले, डॉ. विजय गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख, डॉक्टर, प्राध्यापक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here