साईमत जळगाव प्रतिनिधी
श्री साईराम प्लास्टिक्स् अॅण्ड इरिगेशन कंपनी ही भारतातील सिंचन प्रणाली उत्पादनातील अग्रगण्य कंपनी असून ‘इमिटींग पाईप्स् सिस्टिम-आयएस 13488 ः 2008’ नामांकनानुसार उत्पादन उत्पादित करीत आहे. कंपनीने 2 वर्षापासून ‘इमिटींग पाईप्स् सिस्टिम’ या उत्पादनाच्या निर्मितीत उत्कृष्ट गुणवत्तेचे सातत्य ठेवण्यास घेतलेल्या परिश्रमासाठी बीआयएस (ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड) या भारतीय नामांकन देणार्या संस्थेमार्फत कंपनीला उत्पादनाच्या विश्वासाहर्र्तेसाठी सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले.
श्री साईराम प्लास्टिक्स् अॅण्ड इरिगेशन ही ठिबक सिंचन प्रणाली, पीव्हीसी व एचडीपीई पाईप, तुषार सिंचन, सुक्ष्म तुषार सिंचन, फिल्टर्स, शेड नेट, मल्चिंग पेपर उत्पादित करणारी भारतातील अग्रगण्य कंपनी आहे.
कंपनीचे उत्पादनं ओरिजनल मटेरियलपासून बनविले जात असून उत्पादनाचा दर्जा, गुणवत्ता व वाजवी किंमत असल्याने ‘जे देणार ते उत्तम देणार, वाजवी किंमतीत देणार’ या धोरणानुसार ते शेतकर्यांची पहिली पसंत ठरली आहे. कंपनी उत्पादनाला भारताच्या सर्व राज्यातून मोठी मागणी होत असल्याने कंपनीने त्या त्या राज्यात स्वतःचे डेपो सुरू केले आहेत.
दि.६ जानेवारी रोजी हॉटेल सेंटर पाँईट, नागपूर या ठिकाणी बीआयएस (ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड) या भारतीय संस्थेतर्फे ‘इमिटींग पाईप्स् सिस्टिम’ उत्पादनाच्या गुणवत्तेचे सातत्य कायम ठेवल्यामुळे बीआयएसचे हेमंत आढे (एचओडी बीआयएस) यांच्या हस्ते श्री साईराम प्लास्टिक्स् अॅन्ड इरिगेशनतर्फे रविंद्र महाजन यांनी सन्मानचिन्ह स्वीकारले. कार्यक्रमास बीआयएसचे श्री. विश्वकर्मा व श्री. त्रिवेदी साहेब उपस्थित होते.