साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथील संत सावता माळी माळीवाडा येथे क्षत्रिय माळी समाजाचे अध्यक्ष तथा लोकमान्य विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक, उपक्रमशिल कलाशिक्षक मनोहर भगवान महाजन यांना सामाजिक मुखपत्र ‘माळी भूषण’ यांच्यातर्फे दिल्या जाणारा मानाचा ‘समाज भूषण’ पुरस्कार समारंभपूर्वक नुकताच प्रदान करण्यात आला. मनोहर महाजन हे क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळात (महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात) वीस वर्षांपासून कार्यकारिणी सदस्य आहेत. तसेच क्षत्रिय काच माळी समाज मंडळावर ते तीस वर्षांपासून पदाधिकारी आहे. ते अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहेत. संत सावता माळी सेवा मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आहे. त्या माध्यमातून सतत समाजसेवेच्या कार्यात ते सक्रिय असतात.
समाज संघटन, शिक्षण, पर्यावरण अशा त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना माजी आमदार शिरीष चौधरी, भरत माळी (मा.नगराध्यक्ष, तळोदा), मा.ज्ञानेश्वर महाजन (मा.नगराध्यक्ष, धरणगाव), नाना महाजन (जि.प.सदस्य, जळगाव), बाळासाहेब कर्डक, (प्रदेशाध्यक्ष, अ.भा.महात्मा फुले समता परिषद), शालिग्राम मालकर, (प्रदेशाध्यक्ष, माळी महासंघ), सतिष महाजन, (जिल्हाध्यक्ष, समता परिषद), सुदाम महाजन, ए.के.गंभीर (अध्यक्ष-क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ), मा.प्राचार्य-प्रकाश महाजन, भिमराव महाजन, (संपादक, मासिक ‘माळी भूषण’) यांच्या हस्ते समारंभपूर्वक मनोहर महाजन आणि त्यांच्या पत्नी सौ.रंजना महाजन यांना प्रदान करण्यात आला. समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल मनोहर महाजन यांचे समाजासह सर्व स्तरातून कौतुक होत आहे.