साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
तालुक्यातील सामनेर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.चे चेअरमन सुनील हरी पाटील आणि व्हा. चेअरमन अण्णा पवार यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे शुक्रवारी, १३ ऑक्टोबर रोजी निवडणूक कार्यक्रम प्रक्रियेत सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक माणिकराव माधवराव पाटील यांचा चेअरमन पदासाठी तर शारदा एकनाथ चव्हाण यांचा व्हा. चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडीवेळी विकासोचे संचालक बाळकृष्ण साळुंखे, साहेबराव पाटील, रवींद्र साळुंखे, पंढरीनाथ पाटील, दगा भील, अण्णा पवार, सुनील पाटील, विजय पाटील, मयूर पाटील, रेखा नेरपगार, लीना सोनकुळ आदी उपस्थित होते.
ही निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकार विभागाचे अधिकारी दीपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. निवडीनंतर नवनिर्वाचित चेअरमन माणिकराव पाटील आणि व्हा.चेअरमन शारदा चव्हाण यांचा गावातील नागरिकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच पती भोलेनाथ भील, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र साळुंखे, प्रा. राजेंद्र साळुंखे, गोरख नेरपगार, एकनाथ चव्हाण, सुनील साळुंखे, प्रमोद पाटील, प्रशांत साळुंखे, सचिव छगन गवळी, लिपीक अविनाश पाटील, प्रताप पाटील आदी उपस्थित होते.
