स्नेहमेळाव्यात शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
साईमत/अमळनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील मंगरूळ येथील स्व. अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयातील २००५-०६ मध्ये दहावीतील माजी विद्यार्थ्यांची १९ वर्षांनंतर पुन्हा शाळा भरली. स्नेहमेळाव्यानिमित्त एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. स्नेहमेळाव्यात शाळेच्या शिक्षकांचे ऋण व्यक्त करण्यासाठी शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्हासह पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
मंगरुळ येथील स्व. अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयात रविवारी, २५ मे रोजी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रकाश पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्था चालक श्रीकांत पाटील होते. यावेळी शिक्षक संजय पाटील, प्रभुदास पाटील, अशोक सूर्यवंशी, राजेंद्र पाटील, सुषमा सोनवणे, शितल पाटील, सीमा मोरे, पी.आर.पाटील, मनोज पाटील, प्रदीप पाटील आदी उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन, सरस्वती मातेचे प्रतिमा पूजन करण्यात आले.
सर्वांच्या चेहऱ्यावर उमलले हास्य
स्नेहमेळाव्यात सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपआपला परिचय करून दिल्यावर जुन्या आठवणींना उजाळा दिला. गेल्या १९ वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्र- मैत्रिणींना भेटून सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले होते. यावेळी माजी विद्यार्थिनी तथा कवयित्री कल्पना देवरे यांनी चारोळ्या आणि कविता सादर केल्या.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी ईश्वर भदाणे, रावसाहेब पाटील, प्रदीप पाटील, गुलाब भदाणे, कुंदन वाघ, शरद पाटील, नगराज पाटील, योगेश पाटील, सचिन भदाणे, नरेंद्र बागुल, बापू धनगर, गणेश पाटील, निंबा पाटील, जितेंद्र पाटील, सतीश बागुल, नारायण पाटील यांच्यासह त्यांच्या सर्व मित्रांनी तसेच शाळेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन जागृती पाटील तर कल्पना देवरे यांनी आभार मानले.