मंत्रीपदाचा लाभ पूर्ण राज्याला होणार
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी
विधानसभा मतदार संघात तालुक्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण घवघवीत मतांनी दुसऱ्यांदा आमदारपदी निवडून आले आहे. त्यामुळे चाळीसगावकरांनी मंगेश चव्हाण यांना राज्यमंत्री मंडळात मंत्री बनवावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
चाळीसगाव शहरासह ग्रामीण भागात सर्वात जास्त विकासकामे झाली. नेहमी नागरिकांच्या संपर्कातील आमदार मंगेश चव्हाण यांना बघितले जाते. त्यांना ज्या खात्यात मंत्री पद मिळेल, त्याचा फायदा पूर्ण राज्याला होईल, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.