मानेवाडी ग्रामपंचायतीवर जय मल्हार ग्राम विकास पॅनलचे वर्चस्व

0
54

साईमत लाईव्ह तुळजापूर प्रतिनिधी

मानेवाडी:- तुळजापूर तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतसाठी रविवारी दि. १८ रोजी पार पडलेल्या निवडणुकीमध्ये मौजे मानेवाडी गावचा समावेश होता. या निवडणुकीमध्ये जय मल्हार ग्रामविकास पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत जय मल्हार ग्रामविकास पॅनेलने ८ जागेपैकी ४ जागेवर विजय मिळवला आहे. तर संत मारुती महाराज ग्रामविकास पॅनल ४ जागेवर समाधान मानावे लागले आहे.

यामध्ये जय मल्हार ग्रामविकास पॅनलचे सरपंच पदाच्या विजयी उमेदवार नेहरू दशरथ बंडगर, तर सदस्य पदासाठी विजयी उमेदवार बालाजी बापूराव लकडे, शहाजी ज्ञानोबा हक्के, सुवर्णा लहू सगट, यांचा समावेश आहे. संत मारुती महाराज ग्रामविकास पॅनलमध्ये अर्चना भीमराव टकले, रेखा चंदू देवकर, बिरु धोंडिबा माने, शांताबाई बाबू सगट यांनी विजय मिळवला आहे. या विजयाबद्दल जय मल्हार ग्राम विकास पॅनेलचे सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थांनी गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here