मनेसे शेतकरी सेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकारी नियुक्त्या जाहीर जळगाव तालुका अध्यक्षपदी प्रदीप पाटील, सचिवपदी मनोज लोहार

0
83

साईमत / जळगाव / प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या हस्ते जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारीच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे. सदर नियुक्त्या महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे राज्य सचिव अमोल भिसे यांच्या हस्ते करण्यात आल्या आहे.
जळगाव तालुका अध्यक्षपदी प्रदीप पाटील, जळगाव तालुका उपाध्यक्षपदी देवेंद्र माळी, जळगाव तालुका सचिवपदी मनोज लोहार, जळगाव तालुका संघटकपदी विलास सोनार, जळगाव शहर सचिवपदी हर्षल वाणी, एरंडोल तालुका संघटकपदी शुभम महाजन, एरंडोल तालुका सचिवपदी देवानंद घुले यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे.

जळगाव जिल्ह्यातील केळी पिक विमा,केळीला फळाचा दर्जा मिळावा, हमीभाव योग्य प्रमाणात मिळावा,शेतकऱ्यांसाठी जोडव्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना योजनाचा लाभ मिळवुन देण्यासाठी आमचा पक्ष काम करणार असल्याचे अमोल भिसे यांनी या वेळी बोलतांना सांगितले.
महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या बैठकीत ग्रामीण जिल्हा अध्यक्ष मुकुंदा रोटे, जनहित कक्षाचे राज्य उपाध्यक्ष चेतन अढळकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महानगर अध्यक्ष श्री आशिष सपकाळे महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, जनहित कक्षाचे संदिप मांडोळे, निलेश खैरनार, कमलाकर पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here