विद्यापीठात हेल्मेटसक्ती

0
7

विद्यापीठात हेल्मेटसक्ती

जळगाव ( प्रतिनिधी) –

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात दुचाकी वाहनांसाठी हेल्मेटसक्ती करण्यात आली असून १४ फेब्रुवारीपासून अंमलबजावणी सुरु झाली आहे. हेल्मेट परीधान न करणाऱ्यांना विद्यापीठ प्रवेशद्वारापासून आत प्रवेश देण्यात आला नाही.

१३ फेब्रुवारी रोजी विद्यापीठाने सूचना काढून दुचाकी वाहनांसाठी हेल्मेट सक्ती व चार‍चाकी वाहनांसाठी सिटबेल्टचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. १४ फेब्रुवारी पासून विद्यापीठाच्या राष्ट्रीय महामार्गाजवळील मुख्य प्रवेशद्वार तसेच मुलांचे वसतीगृहाजवळील प्रवेशद्वाराजवळ हेल्मेट न घालणाऱ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. प्रवेशद्वाराजवळ दुचाकी वाहन लावून अनेक जण पायी विद्यापीठात आले. ६० पेक्षा अधिक वाहनांना रोखण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here