साईमत/ न्यूज नेटवर्क । जळगाव ।
पत्रकारांच्या हितसंरक्षणासाठी आणि पत्रकारांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या व्हाईस ऑफ मीडिया संघटनेचे जळगाव जिल्हा महानगराध्यक्ष म्हणून ‘साईमत’चे व्यवस्थापकीय संचालक परेश सुरेखा प्रमोद बऱ्हाटे यांची नुकतीच निवड जाहीर केली आहे. ही निवड व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा ज्येष्ठ पत्रकार संदीप काळे, राष्ट्रीय सचिव दिव्या भोसले यांच्या आदेशावरून प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के पाटील यांच्या संमतीने संघटनेचे जिल्हाध्यक्ष मिलिंद टोके यांनी जाहीर केली.
याबद्दल माजी माहिती आयुक्त व्ही.डी. पाटील, माजी महापौर जयश्री महाजन, व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ‘साईमत’चे कार्यकारी संपादक सुरेश उज्जैनवाल, वाणिज्य संपादक विवेक ठाकरे, विभागीय अध्यक्ष डिगंबर महाले, संघटनेच्या उर्दू विंग्सचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारून नदवी, शासनमान्य अधिस्वीकृतीधारक ज्येष्ठ पत्रकार रवींद्रशेठ नवाल, ‘साईमत’चे वृत्तसंपादक छगनसिंग पाटील, मनोज मानकरे, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष वासुदेव नरवाडे आदींनी परेश बऱ्हाटे यांचे अभिनंदन केले आहे.