Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Akulkheda (Tal. Chopra) :रागाच्या भरात प्रेयसीवर गोळी; नंतर प्रियकराची आत्महत्या
    क्राईम

    Akulkheda (Tal. Chopra) :रागाच्या भरात प्रेयसीवर गोळी; नंतर प्रियकराची आत्महत्या

    saimatBy saimatMarch 1, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Akulkheda (Tal. Chopra) :: In a fit of rage, lover shoots at girlfriend; later boyfriend commits suicide
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    प्रेमातून पेटले वैर; प्रेयसीची गोळी झाडून हत्या, प्रियकराची आत्महत्या

    साईमत/अकुलखेडा (ता. चोपडा)/प्रतिनिधी :

    तालुक्यातील अकुलखेडा येथे प्रेमप्रकरणातून घडलेल्या दुहेरी मृत्यूच्या धक्कादायक घटनेने परिसर हादरून गेला आहे. प्रेयसीवर गावठी पिस्तुलातून गोळी झाडून तिची हत्या केल्यानंतर प्रियकराने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवल्याची घटना २८ रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे गावात भीती आणि हळहळ व्यक्त होत आहे.

    अकुलखेडा येथील जगदीश काशिनाथ पाटील यांच्या राहत्या घरी अनिता जगदीश पाटील (वय ४०) आणि देवा सुरेश धनगर (वय ४०) यांचे रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आले. ही घटना सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. जगदीश पाटील यांची मुलगी शाळेतून घरी परतल्यानंतर तिने घरात प्रवेश केला असता दोघांचेही मृतदेह पाहून ती घाबरून गेली. तिने आरडाओरडा करत शेजाऱ्यांना माहिती दिली. काही क्षणांतच परिसरात एकच खळबळ उडाली.

    प्राथमिक माहितीनुसार, अनिता पाटील आणि देवा धनगर यांची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली होती. ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमसंबंधात झाले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अनिता या देवा धनगर यांना अपेक्षित वेळ देत नसल्याने तो संतप्त झाला होता. रागाच्या भरात देवा धनगर अकुलखेडा येथे अनिता यांच्या घरी पोहोचला. वाद वाढल्यानंतर त्याने जवळ बाळगलेल्या गावठी पिस्तुलातून अनिता यांच्या डोक्यात गोळी झाडून त्यांची हत्या केली. त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

    घटनास्थळी देवा धनगर यांची दुचाकी आढळून आली असून ती पोलिसांनी जप्त केली आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोघांचेही मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलवून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.

    या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर सावळे करीत आहेत. प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे अकुलखेडा परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात असून, सोशल मीडियातून निर्माण होणाऱ्या संबंधांबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

    10हेडला
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon : मेहरूणमध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना

    March 1, 2026

    Jalgaon:जळगाव शहरात घरफोडीची घटना; कोल्हे नगरातून ४० हजारांचा ऐवज लंपास

    March 1, 2026

    Chalisgaon : चाळीसगाव शहरात भरवस्तीत घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.