Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मलकापूर»मलकापुरला कोलते पॉलिटेक्निकला प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ
    मलकापूर

    मलकापुरला कोलते पॉलिटेक्निकला प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 31, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

    स्थानिक पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते पॉलिटेक्निकमधील अद्ययावत संगणकीय साधन सामुग्री, पुरेशा क्षमतेची इंटरनेट सुविधा, प्रशिक्षित व योग्य संवाद साधणारा प्राद्यापक वर्ग आदी बाबींचा विचार करून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षणालय, मुंबई (डी.टी.ई.)च्यावतीने कोलते महाविद्यालयात २०२४-२५ च्या प्रथम वर्ष पॉलिटेक्निक प्रवेशासाठी २९ मे पासून ऑनलाईन प्रवेश सुविधा केंद्र (फॅसिलिटेशन सेंटर) सुरू झाले आहे. नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना कुठल्याही अतिरिक्त कागदपत्राची आवश्‍यकता नसून विद्यार्थ्यांनी येत्या २५ जून पर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची आहे, अशी माहिती कोलते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी दिली.

    प्राचार्य डॉ. खर्चे म्हणाले की, भारतीय नागरिकत्व असलेला विद्यार्थी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या अथवा तत्सम परीक्षेत किमान ३५ टक्के गुणांनी उत्तीर्ण असावा. याप्रमाणे प्रवेश पात्रता धारण केलेले विद्यार्थी येथील सुविधा केंद्राच्यामार्फत कोलते महाविद्यालयासह महाराष्ट्रात कोठेही प्रवेशासाठी पात्र असणार आहेत. विद्यार्थ्यांना केंद्रामार्फत त्यांचा कल आणि सध्या मागणी असलेल्या पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आता पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया व पदविका अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यावर भविष्यातील संधी हे जाणून घेण्यासाठी आता कोठेही जाण्याची गरज नाही. या संधीचा फायदा घेण्यासाठी इच्छुकांनी कोलते महाविद्यालयातिल सुविधा केंद्रास भेट देवून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, उमेदवारांच्या जातीनिहाय संवर्गानुसार आवश्‍यक कागदपत्रे व इतर माहितीसाठी या केंद्रातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तज्ज्ञ प्राध्यापकांची केंद्रात नेमणूक केली आहे. शिष्यवृत्त्या, शैक्षणिक कर्ज व त्यासाठी लागणारे कागदपत्रे तसेच शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारे कागदपत्रे यासंदर्भात माहिती येथे मिळणार आहे.

    विद्यार्थ्यांसह पालकांनी सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन

    केंद्रामार्फत ऑनलाईन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी करणे आणि अर्ज निश्‍चिती करणे इत्यादी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. प्रक्रियेत महाराष्ट्र राज्यातील सर्व साधारण प्रवर्ग, महाराष्ट्र राज्याबाहेरील (ओएमएस) विद्यार्थ्यांसाठी ४०० रुपये तर फक्त महाराष्ट्र राज्यातील राखीव प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी ३०० रुपये शुल्क भरावे लागेल. दोनही प्रकारचे शुल्क क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बॅन्कींगद्वारे अदा करावे लागेल. एखाद्याकडे यातील काहीच नसेल तर त्यासाठी पर्याय दिले जातील. विकल्प (ऑप्शन) देणे, मेरीट लिस्ट घोषित होणे, प्रवेश फेऱ्या आदी बाबींचे वेळापत्रक डीटीईमार्फत लवकरच जाहीर केले जाणार आहे.

    विद्यार्थ्यांसह पालकांनी या सुविधेचा फायदा घ्यावा, अधिक माहितीसाठी महाविद्यालयाचे प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयाचे चेअरमन डी. एन. पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब पाटील, महाविद्यालयाचे सचिव डॉ. अरविंद कोलते, महाविद्यालयाचे खजिनदार सुधीर पाचपांडे यांनी केले आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Malkapur : मलकापूरमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त भव्य मोटारसायकल रॅली

    January 31, 2026

    Malkapur:मलकापूरला धक्का व्यवसायिक ऑटोचालकाचा रस्त्यावर निर्घृण खून

    January 8, 2026

    Malkapur:पोलीस वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनमधील कामकाजाचे मार्गदर्शन

    January 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.