नवा संसार सुखाने करा ; संजय राऊत

0
28

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी :

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला असून महाराष्ट्राचे २० वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी नुकतीच शपथ घेतली. त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी ही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा दिल्या. आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी शुभेच्छा देत नवा संसार सुखाने करा असे म्हटले आहे.

तसेच आम्ही नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये अडथळे निर्माण करणार नाही. त्यामुळे त्यांनी जनतेसाठी काम करावे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

शिवसेना कमकुवत झाली आहे आणि नाराज आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर राऊत म्हणाले, मला वाटत नाही की आमची संघटना कधी कमकुवत झाली आहे… कोणी नाराज नाही.” आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आमदार खूश होतील, असेही राऊत म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here