साईमत जळगाव प्रतिनिधी
भारतीय जैन संघटना ही खुप नियोजन करून प्रश्न सोडविते. आपल्याजवळ असलेला मनुष्यबळ, संसाधने याचा विचार करून ते पुढे जातात , देशाच्या विकासात या संघटनेचे मोठे योगदान आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. ते भारतीय जैन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात रविवारी ३ सप्टेंबर रोजी दुसरे राज्यस्तरीय सभेच्या आयोजन प्रसंगी ते बोलत होते.
जिल्हा अधिकारी पुढे म्हणाले, कोरोना काळात कोविड मुक्त गाव साठी जैन संघटनेचे योगदान मोठे आहे. १ हजार ३८५ ग्रामपंचायत होती. पैकी ३८ ग्राम पंचायतीत एक ही कोविड पेशंट मिळाला नाही. तसेच ६०० ग्रामपंचायतीत केवळ १० रूग्ण होते. त्यामुळे ऊर्जा निर्माण झाली. स्कुल एक्रीडेशन मधे संघटनेने मोठे काम केले आहे. गुजराथ सरकारने 2010-11मधे ते स्विकारले नंतर गोवा सरकारने व आता निती आयोग इतरत्र स्विकारत आहे.पाण्याच्या बाबतीत संघटनेचे अविस्मरणीय कार्य आहे.
यावेळी उद्योजक अशोकभाऊ जैन म्हणाले की, मी मूल्यवर्धन शिक्षणासाठी जळगाव जिल्ह्यात सोबत कार्य केले आहे. शांतीलाल मुथा यांचे खुप मोठे कार्य आहे. त्यांचा पद्मश्री पुरस्कारसाठी प्रस्ताव आपण पाठविले पाहिजे.पाण्यासाठी जे ही योगदान लागेल ते मी व जैन उद्योग देण्यास तयार आहे.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्राचे सचिव अमृत पारख यांची कन्या राशी पारख सी.एस. परीक्षेत देशात प्रथम आल्याबद्द्ल तिचा संघटनेच्या वतीने स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक राज्य उपाध्यक्ष विनय पारख यांनी केले.
राज्याध्यक्ष नंदकिशोर सांखला यांनी वर्षभरात संघटनेचे करावयाची कार्याची माहिती दिली. राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य केतन शाह, राज्य सचिव दीपक चोपडा, राज्य उपाध्यक्ष महेंद्र मंडलेचा, कांचनमाला सांगवे व्यासपीठावर उपस्थित होते.पूर्ण महाराष्ट्रातील राज्य कार्यकारिणी सदस्य, विभागीय पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष, जिल्हा सचिव उपस्थित होते. सूत्र संचालन पुष्पा भंडारी तर आभार प्रदर्शन विभाग अध्यक्ष अशोक श्रीश्रीमाळ यांनी केले.