Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»CEO Minal Karanwal : स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी आत्मविश्वासासह शिस्त, सातत्य ठेवा : सीईओ मिनल करनवाल
    जळगाव

    CEO Minal Karanwal : स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी आत्मविश्वासासह शिस्त, सातत्य ठेवा : सीईओ मिनल करनवाल

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 13, 2025Updated:June 13, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अभ्यासिकेत विद्यार्थ्यांसाठी आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात जि.प.च्या सीईओ मिनल करनवाल यांचे प्रतिपादन

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वासासोबत शिस्त, सातत्य आणि प्रामाणिकपणा ठेवावा, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले. त्या शुक्रवारी, १३ जून शहरातील जी.एस. मैदानाजवळील विद्यानिकेतन शाळेत सुरु केलेल्या अभ्यासिकेत आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी उपयुक्त मार्गदर्शन केले.

    यशस्वी उमेदवारांचे व्हिडीओ बघून अभ्यासाची पद्धत ठरवू नका. स्वतःच्या क्षमतेनुसार योग्य पद्धतीने अभ्यास करा. यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. मेहनत हीच यशाची गुरुकिल्ली आहे, असे त्यांनी स्पष्ट सांगितले. प्रत्येक परीक्षेसाठी एक निश्चित अभ्यासक्रम असतो. तो डोळ्यासमोर ठेवून मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका सोडवा, सराव करा. सातत्याने सराव केल्यास आत्मविश्वास वाढतो आणि परीक्षेच्या वेळी मन:स्थिती स्थिर राहते. परीक्षेला जाताना योग्य मानसिकता अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले.

    विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अन्‌ मनोबल वाढविणारे ठरले मार्गदर्शन

    विद्यार्थ्यांना आत्मपरीक्षणाचे आणि स्वतःशी प्रामाणिक राहण्याचे आवाहन सीईओ करनवाल यांनी केले. मनात भीती असावी, पण त्या मेहनतीत अडथळा ठरू नये. यश-अपयशासाठी इतरांना दोष देण्याऐवजी आपली जबाबदारी स्वतः स्वीकारा. प्रत्येक व्यक्तीत यशस्वी होण्याची क्षमता असते, ती ओळखून योग्य दिशा आणि प्रयत्न आवश्यक असतात, असेही त्या म्हणाल्या. त्यांनी ७ मुद्यांच्या आधारे स्पर्धा परीक्षेतील यशाचा प्रवास उलगडून दाखविला. करनवाल यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि मनोबल वाढविणारे ठरले. कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह पालक उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्या अडचणी सांगत मार्गदर्शन घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.