महुआ मोइत्रा यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

0
24

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

ॲपल कंपनीकडून आयफोनवर सरकार-पुरस्कृत सायबर हल्ल्याचा इशारा मिळाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी आपल्यासह हा इशारा मिळालेल्या इतर खासदारांना आपले कर्तव्य बजावण्यासाठी संरक्षण प्रदान करावे, अशी विनंती लोकसभा अध्यक्षांकडे केली.
सरकारकडून केली जाणारी ही बेकायदा टेहेळणी हा राज्यघटनेने हमी दिलेल्या ‘मूलभूत हक्कांवरील सर्वात वाईट हल्ला’ असल्याचे मोइत्रा यांनी या पत्रामध्ये नमूद केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, विरोधी पक्षाच्या नेत्यांना ॲपल कंपनीकडून ‘सरकार-पुरस्कृत हल्लेखोर तुम्हाला लक्ष्य करत असल्याचा’ संदेश मिळाला आहे. हे हल्लेखोर दूरस्थ पद्धतीने उपकरणांमध्ये हस्तक्षेप करण्यासह त्यातील डेटा, संभाषणे आणि अगदी कॅमेरा व मायक्रोफोनपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. मोइत्रा यांनी या पत्रामध्ये पेगासस स्पायवेअरचीही आठवण करून देत विरोधी पक्षाच्या खासदारांना तातडीने संरक्षण प्रदान करण्याची विनंती केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here