दहा वर्षांपासून संस्था राबवतेय स्तुत्य उपक्रम
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
समाज चिंतामणी प्रतिष्ठान या शासन मान्यताप्राप्त सामाजिक संस्थेतर्फे उनपदेव येथील आदिवासी पाड्यावर ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे मानसपुत्र डी. बी. महाजन, ज्येष्ठ साहित्यिक भास्करराव चव्हाण, कवी अशोक पारधे तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर. डी. कोळी यांच्या हस्ते नवे- जुने ड्रेस, साड्या, पंजाबी ड्रेस, कोट,स्वेटर, कानटोप्या, शाली अशा विविध एक हजार वस्त्रांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मुलांना लाडू वाटप करण्यात आले. त्यामुळे पाड्यावरील अबालवृद्ध आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले होते.
गेल्या दहा वर्षापासून समाज चिंतामणी प्रतिष्ठान वस्त्रदानाचा स्तुत्य उपक्रम राबवत आहे. त्यामुळे शेकडो आदिवासी, गरजूंना उपक्रमाचा लाभ झाला आहे. त्याबद्दल प्रतिष्ठाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते जयसिंग वाघ, रोहिणी ठोंबरे, मिलिंद ठोंबरे, वर्षा अहिरराव, युवराज सोनवणे, रेखा म्हात्रे, संस्थेच्या सचिव शालिनी सैंदाणे, रमेश बारेला, गोविंद बारेला, नारायण बारेला, काशीराम बारेला यांनी परिश्रम घेतले.