महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयातील यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांचा सत्कार

0
29

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

गेल्या एक ते दीड महिन्यापासून तालुक्यात सुरु असलेल्या विविध क्रीडा स्पर्धा, विविध वैयक्तिक मैदानी स्पर्धांमध्ये शहरातील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित माध्य. विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळविलेले आहे. अशा सर्व यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांचा सत्कार महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील, सचिव डॉ. स्मिता पाटील यांच्या हस्ते गुलाब पुष्प देवून नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी सहसचिव प्राचार्य डॉ. डी.ए.सूर्यवंशी, महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक निळकंठ सोनवणे, क्रीडा शिक्षक अशोक साळुंखे, विद्यालयातील जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षकांच्या पतपेढीचे संचालक संजय सोनवणे उपस्थित होते.

यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडाशिक्षक अशोक साळुंखे, मुख्याध्यापक निळकंठ सोनवणे यांचाही सत्कार अध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here