साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालयात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेच्या पूजनासह माल्यार्पण करून अभिवादन केले. त्यानंतर शासनाच्या आदेशानुसार महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात आली. अध्यक्षस्थानी लोकमान्य विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक मनोहर महाजन होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका मनिषा खांजोडकर होते. यावेळी ज्येष्ठ शिक्षक मधुकर सोनार, सायली देशपांडे, भूषण महाले, आशा सोनवणे, रेखा कांबळे, मृदुला झारे, संदिप महाजन, संदीप मुंदाणकर, हरीश भामरे, वरिष्ठ लिपीक नचिकेत महाले, लॅब ॲटेडंट प्रसाद जोशी, शिपाई प्रवीण गांगुर्डे, अनिता बिऱ्हाडे आदी कर्मचारी उपस्थित होते.