National Taekwondo Championship : जळगावातील राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत ‘महाराष्ट्राची’ बाजी

0
19

१० सुवर्णांसह १९ पदके ; मान्यवरांच्या हस्ते पदके प्रदान

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

सीआयएससीईच्या सहाव्या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत महाराष्ट्राने दमदार कामगिरी करत १९ पदके पटकावली. त्यात १० सुवर्ण, ४ रौप्य आणि ५ कांस्य पदकांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी देशभरातून आलेल्या स्पर्धकांवर वर्चस्व गाजवले. विशेष म्हणजे आयोजक जळगावच्या अनुभूती स्कूलच्या तीन विद्यार्थिनींनी पदके मिळवत महाराष्ट्राच्या यशात भर घातली. विजेत्या खेळाडूंना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, अनुभूती स्कूलचे प्राचार्य देबासीस दास आणि आंतरराष्ट्रीय पंच ए. टी. राजीव यांच्या हस्ते पदके प्रदान करण्यात आली.

१४ वर्षाखालील गटात महाराष्ट्राची दिशा मेहता (मुंबई) हिने उत्कृष्ट कामगिरी करत ‘सर्वोत्तम खेळाडू’ हा मान मिळवला. १७ वर्षाखालील ६३ किलो गटात मंजिरी तळगावकर (सातारा, महाराष्ट्र) हिने सुवर्णपदक जिंकले तर त्याच गटात अनिका (कर्नाटक-गोवा) आणि तनिष्का शर्मा (उत्तर प्रदेश) यांनी रौप्य तसेच समयराणी (ओडिशा) हिने कांस्य मिळवले. ५२ किलो गटात महाराष्ट्राची विरती बेदमुथा (छत्रपती संभाजीनगर) हिने सुवर्ण पटकावले, रौप्य माहिका (उत्तर भारत) हिला मिळाले तर अनुष्का मुद्री (दिल्ली) आणि देवांगी चक्रवर्ती (आसाम) यांनी कांस्य जिंकले. ६८ किलो गटात कर्नाटक-गोवाची खुशी एस. सुवर्णविजेती ठरली, बिहार-झारखंडची हिना कुमारी हिला रौप्य मिळाले तर महाराष्ट्राची निया दोषी (पुणे) आणि ओडिशाची स्वागतिका यांनी कांस्य पदक मिळवले. ४९ किलो गटात कर्नाटक-गोवाची पूर्विका ए. सुवर्णविजेती ठरली. महाराष्ट्राची सर्वज्ञा (नाशिक) हिला रौप्य तर आंध्र-तेलंगणाची हर्षिका आणि नॉर्थवेस्टची अबिया वरुगेसी यांनी कांस्य मिळवले.
४४ किलो गटात नॉर्थवेस्टची जया देसाई सुवर्णविजेती ठरली, उत्तर प्रदेशची श्रेया गुप्ता हिला रौप्य मिळाले तर हिरा महस्त्रिया (हिमाचल प्रदेश) आणि दमंजोत कौर (पंजाब) यांना कांस्य मिळाले. ३५ किलो गटात महाराष्ट्राची स्वस्तिका (जळगाव) सुवर्णविजेती ठरली.उत्तर प्रदेशची आद्या शर्मा हिला रौप्य तर अप्सरा परवीन (बिहार-झारखंड) आणि ए. शहया (तमिळनाडू-पॉडेचेरी-अंदमान-निकोबार) यांना कांस्य मिळाले. ३२ किलो गटात उत्तर प्रदेशची मिठी राठी सुवर्णविजेती ठरली तर उत्तर भारताची क्रितीका हिला रौप्य मिळाले.

अनुभूती स्कूलच्या खेळाडू मुलींची सरशी

जळगावातील अनुभूती स्कूलच्या खेळाडूंपैकी अलेफिया शाकीर (जळगाव) हिने ६८ किलो गटात कांस्य, समृद्धी कुकरेजा (जळगाव) हिने ४९ किलो गटात कांस्य तर पलक सुराणा (जळगाव) हिने रौप्य पदक मिळवले. अशा शानदार कामगिरीमागे जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रमुख अरविंद देशपांडे तसेच प्रशिक्षक अजित घारगे, जयेश बाविस्कर, महेश घारगे, रवींद्र धर्माधिकारी, प्रवीण ठाकरे, समीर शेख, मोहम्मद फजल, सुयश बुरकूल, किशोर सिंग, वाल्मिक पाटील, सोनाली हटकर, घनश्याम चौधरी, उदय सोनवणे, राहुल निभोंरे, सैय्यद मोहसीन, अब्दुल मोसीन जब्बार, योगेश धोंगडे, दिपिका ठाकूर यांच्या परिश्रमाचे मोठे योगदान राहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here