साईमत जळगाव जळगाव
भारतीय आट्यापाट्या महामंडळाच्या वतीने ७वी फेडरेशन चषक वरिष्ठ गट राष्ट्रीय आटयापाट्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन कोझिकोडे केरळ येथे दि १७ते १९ जानेवारी या कालावधीत होत आहे. या फेडरेशन चषक राष्ट्रीय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धेसाठी मंगला एक्सप्रेस ने भुसावळ येथून महाराष्ट्राचा संघ रवाना झाला .
या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या संघाची घोषणा सचिव डॉ. अमरकांत चकोले यांनी केली आहे. पुरुष संघाच्या कर्णधार पदी अमरावती येथील सर्वेश मेन तर महिला संघाच्या कर्णधारपदी प्राची चटप भंडारा यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या संघात निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक भारतीय आट्यापाट्या महामंडळाचे सचिव डॉ. दीपक कवीश्वर, महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे, जळगाव जिल्हा आट्यापाट्या संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, सचिव डॉ.अमरकांत चकोले, जिल्हा संघटनेचे सचिव डॉ. प्रदीप तळवेलकर, सोनू मांडे, वनवासी कल्याण आश्रम खेलकुद पश्चिम विभाग प्रमुख एम. के. वाणी सर, आटयापाट्या राज्य कार्यकारणी सदस्य अनिल माकडे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त विशाल फिरके, क्रीडा भारतीचे बी. एन. पाटील, लीलाधर पाटील यांनी केले आहे.
पुरुष संघ – सर्वेश मेन (अमरावती कर्णधार), सुनील पांडे( नागपूर ), हर्ष काकडे (वाशिम), सौरभ ताजणे (वाशिम), सुमित मुंढंरे( वाशिम ), रोहित नवले (जळगाव), स्वप्निल महाजन (जळगाव), रोहन घुसणार( सोलापूर), रोहन काळे (संभाजीनगर ), शिवशंकर नागपुरे (भंडारा) , सौरभ शिंदे (धाराशिव), प्रदीप डाखोकर (बुलढाणा) , जय कवीश्वर (प्रशिक्षक), योगेश शेरमाळे (व्यवस्थापक)
महिला संघ – प्राची चटप (कर्णधार) (भंडारा ), शिल्पा डोंगरे (धाराशिव), प्रीती शिंदे (धाराशिव ), अनुजा लोंढे(धाराशिव), निवेदिका कोळंबे (जळगाव), नेहा कांगटे (जळगाव), श्रुती कडव (नागपूर), अनुराधा मोरे (ठाणे ), अपेक्षा सापुते( नाशिक), वैभवी चव्हाण (ठाणे), वंशिका कांबळे (संभाजीनगर), मिताली गणवीर (भंडारा), पूनम कोकाटे (प्रशिक्षक) , स्नेहल रामटेके (व्यवस्थापक).