नाशिक येथे आयोजित महाराष्ट्र राज्य जम्प रोप स्पर्धा ; मुलांमध्ये पालघर तर मुलींमध्ये नाशिकला विजेतेपद

0
22
नाशिक येथे आयोजित महाराष्ट्र राज्य जम्प रोप स्पर्धा मुलांमध्ये पालघर तर मुलींमध्ये नाशिकला विजेतेपद-saimat

साईमत ओझर प्रतिनिधी

महाराष्ट्र जंपरोप असोसिएशनच्या मान्यतेने नाशिक (Nashik) जिल्हा जंपरोप असोसिएशन, अस्मिता दर्शन महिला मंडळ नाशिक आणि स्व. उत्तमरावजी ढिकले स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १६ व्या ज्युनियर गटाच्या महाराष्ट्र राज्य जंपरोप अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन नाशिकच्या आग्रा रोड येथील शुभमंगल कार्यालय येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्रातून यजमान नाशिक समवेत धुळे ,परभणी, नंदुरबार, बुलढाणा, मुंबई उपनगर ,रायगड, ठाणे, पुणे सोलापूर ,सोलापूर ,जालना यवतमाळ, अमरावती ,बीड ,लातूर पालघर ,सांगली ,अहमदनगर छत्रपती संभाजी नगर, जळगाव, नांदेड, अशा एकूण २२ जिल्ह्यांच्या खेळाडूंनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत मुलांमध्ये पालघर संघाने यजमान नाशिकचा पराभव करून वीजेतेपद मिळवले. तर ,मुलींच्या गटात यजमान नाशिकच्या संघाने अंतिम सामन्यात नंदुरबार संघावर विजय मिळवत ए स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. मुलांमध्ये जालना संघाला तिसरा क्रमाक मिळाला तर मुलींच्या गटात रायगड संघाने तिसरे स्थान मिळविले.

या स्पर्धांच्या पारितोषिक वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाचे उपअभियंता दयानंद बुकाने, नाशिक जिल्हा कर्मचारी बँकेचे संचालक निलेश देशमुख, माउंट लिटेरा झी स्कूलच्या प्राचार्या सौ. विनया मोरे -भालेराव, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त शेषनारायण लोढे, नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशनचे सचिव राजू शिंदे, महाराष्ट्र जंपरोप संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ. पांडुरंग रणमाळ, सरचिटणीस दीपक निकम, खजिनदार श्री. प्रशांत पारगावकर, आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आनंद खरे यांनी भूषविले. या स्पर्धत विजयी ठरलेल्या खेळांडूंना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आकर्षक चषक, मेडलं आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या सर्व मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना आकर्षक चषक, मेडलंस आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उप अभियंता दयानंद बुकाने यांनी उपस्थितीत खेळाडूंना खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केल्याबद्दल कौतुक केले. निलेश देशमुख यांनी देशातील शिक्षण आणि खेळ यांची सांगड घालून पालकांनी विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. तर प्राचार्या सौ. विनया मोरे राज्यस्तरीय खेळाडूंचा आकर्षक खेळ बघून आम्ही आपल्या शाळेत अशा खेळांना प्रोत्साहन देऊन खेळ वाढीसाठी यथाशक्ती मदत करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंद खरे यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून सांगितले की जगातील स्तरावर हा खेळ खेळला जातो. सध्या अमेरिका येथे जागतिक स्पर्धा सुरू आहेत अनु या स्पर्धेत भारताचे खेळाडू सहभागी झाले आहेत यामध्ये महाराष्ट्राच्या १२ खेळाडूंचा सहभाग आहे. या खेळाडूंनी या जागतिक स्पर्धेत चांगला खेळ करून पदके मिळविली आहेत. त्यामुळे आपणही मेहनत करून देशासाठी खेळावे असे आवाहन केले.

यावेळी महाराष्ट्र जम्प रोप असोसिएशनचे सचिव दिलं निकम यांनी जम्प-रोप या खेळाचा आगामी आशियाई स्पर्धेत सहभाग निश्चित केला आहे अशी माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश वाघ यांनी केले, तर आभार प्रशांत पारगावकर यांनी मानले.
या स्पर्धा यशस्वीतेसाठी ऋषिकेश रसाळ, अमोल आहेर, ज्योती निकम, मनीषा काठे आदींनी परिश्रम घेतले.

स्पर्धेचा अंतिम निकाल
मुले :
प्रथम – पालघर
द्वितीय – नाशिक
तृतीय – जालना
मुली :
प्रथम – नाशिक
द्वितीय नंदुरबार
तृतीय :- रायगड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here