Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राजकीय»या सापांना ठेचण्यासाठी महाराष्ट्राने पायतानाचा वापर करावा – आ.जितेंद्र आव्हाडांचे आवाहन
    राजकीय

    या सापांना ठेचण्यासाठी महाराष्ट्राने पायतानाचा वापर करावा – आ.जितेंद्र आव्हाडांचे आवाहन

    saimatBy saimatAugust 26, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कोल्हापूर ः

    हसन मुश्रीफ यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. त्यांच्यावर कारवाई झाल्याने त्यांनी अजित पवार गटासह जात भाजपाला साथ दिली. त्यामुळे शरद पवारांनी त्यांच्या भूमिकेवर टीका केली. यावेळी हसन मुश्रीफांनीही शरद पवारांवर टीका करत शरद पवारांनी सहानुभूती दाखवली नाही, असे म्हटले. यावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

    पक्षाकडून आणि पक्षातील नेत्यांकडून सहानुभूती मिळाली नाही, असा दावा हसन मुश्रीफांनी केला असल्याबाबत प्रश्न पत्रकारांनी जितेंद्र आव्हाडांना विचारला. त्यावर ते म्हणाले की, काय करायचं साहेबांनी? साहेबांनी काय करावं अशी इच्छा आहे? सहानुभूती म्हणजे काय असते? तुमच्यासह मी उभा आहे हे सांगणे सहानुभूती नाही का? शरद पवारांनी अजून काय करावे अशी अपेक्षा आहे? असे प्रश्न जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केले.

    १८ वर्षे मंत्री असतानाही विकास नाही केला

    “१८ वर्षे मंत्री असतानाही हसन मुश्रीफांनी काय केले. १८ वर्षे मंत्री असूनसुद्धा आम्ही विकासासाठी चाललो आहोत, असे म्हणायला काही वाटत नाही. कामगार मंत्री, ग्रामीण विकास मंत्रीपद दिल्यानंतरही रडगाणं सुरू आहे”, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

    दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जितेंद्र आव्हाड आणि हसन मुश्रीफ यांच्यातील वाद उफाळून आला आहे. काल (२५ ऑगस्ट) कोल्हापुरात झालेल्या सभेतही जितेंद्र आव्हाड यांनी हसन मुश्रीफांवर टीका केली होती. “महाराष्ट्रात आता गद्दारी दिसू लागली आहे. हे साप बिळात होते. बिळातले साप आता बाहेर पडू लागले आहेत. या सापांना ठेचण्यासाठी आपल्याला पायतानाचा वापर करावा लागेल. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे या कोल्हापुरात सर्वात प्रसिद्ध काय आहे? पायतान! या पायतानाचा उपयोग अख्या महाराष्ट्राने करावा अशी माझी इच्छा आहे”, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Shocking Train Incident : नर्मदापुरम रेल्वे स्थानकावर थरकाप; आईने ८ वर्षीय मुलीला चालत्या रेल्वेसमोर ढकलले

    March 19, 2026

    Government Alert : गॅस टंचाई टाळण्यासाठी सरकार सतर्क; शाळा-रुग्णालयांना १००% पुरवठा

    March 18, 2026

    Political : ‘राजकीय गणिते’ पुन्हा मांडणीवर; ठाकरे गटातील खासदार शिंदेंच्या संपर्कात?

    March 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.