भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेण्याचे मरीआई देवस्थानतर्फे आवाहन
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील आमखेडा देवी येथील भाविकांचे श्रद्धास्थान श्री तीर्थक्षेत्र मरीआई देवस्थान येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधून गुरुवारी, १० जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत भव्य महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री मरीआई मातेस वंदन करून प.पू. अशोक महाराज यांचे आशीर्वाद घेऊन महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हा कार्यक्रम ब्रह्मलीन प.पू. संत अशोक महाराज यांच्या भक्त परिवाराच्यावतीने होणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी जामनेर आगारातून जामनेरहून सकाळी ६:४५, सकाळी १० वा., सायंकाळी ७ वा. अशा बस फेऱ्या उपलब्ध राहतील. सर्व भाविकांनी उपस्थित राहून श्री मरीआई मातेचा आशीर्वाद घेऊन महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन मरीआई देवस्थानने केले आहे.