
क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिकसह विविध कार्यक्रम
साईमत/पारोळा/प्रतिनिधी :
महापरिनिर्वाण दिनानिमित्त पारोळा येथील विविध शाळांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. यानिमित्त क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक
शहरातील महामार्गालगत असलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त समितीतर्फे मान्यवरांनी प्रतिमेला पुष्पहार न आणता एक वही व एक पेन आणावे. व ते साहित्य संकलन करून गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येईल, असा आगळावेगळा उपक्रम राबविला. यावेळी शिक्षक राहुल सूर्यवंशी यांनी १२ वह्या, १० पेन्सिल व १ पेन पॉकेट भेट दिले. त्याचबरोबर जवळपास ३० ते ३५ जणांनीही वही, पेन, साहित्य, वस्तू भेट दिली. आयोजकांनी एका वहीत भेट देणाऱ्यांचा अभिप्राय लिहून घेतला. दरम्यान, आ.अमोल पाटील यांनी डॉ.आंबेडकर स्मारक येथे भेट देऊन अभिवादन केले व आयोजित उपक्रमाचे कौतूक केले.
टायगर इंटरनॅशनल स्कूल
महापरिनिर्वाण दिनानिमित्त टायगर इंटरनॅशनल स्कूलमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व पूजन करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या शुभारंभाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त शाळेत आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा महोत्सव स्पर्धा असे विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. शिक्षकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण ठेवण्याचे व सामाजिक समतेचा संदेश पुढे नेण्याचे निर्धारपूर्वक वक्तव्य यावेळी केले. कार्यक्रमास लक्ष्मण, गोविंद जाधव, उमेश राहन, संजय भावसार, संजय पाटील, प्रदीप पाटील, निशिकांत पाटील यांच्यासह स्कूलचे अध्यक्ष रविंद्र पाटील, संचालिका रुपाली पाटील उपस्थित होते.
श्री.व्यंकटेश विद्यालय
श्री व्यंकटेश माध्यमिक विद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक उध्दव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. सुशांत पवार व योगेश पाटील या विद्यार्थ्यांनी डॉ.आंबेडकरांचे कार्य सांगितले तर शिक्षक राहुल सूर्यवंशी, योगेश पारधी, अक्षय भोसले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन कार्य व शैक्षणिक कार्य विषद केले. तसेच स्वातंत्र भारतासाठी लिहिलेले संविधानाबद्दल विस्तृत माहिती दिली. यावेळी शुभम पाटील, रामदास दाभाडे, शरद देवरे, अतुल मराठे, विरेंद्र पवार, कविता पाटील, पल्लवी पाटील आदी उपस्थित होते.
करोडपती स्कूल
श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित सौ.एम.यु.करोडपती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण पूजन करण्यात आले.याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यु.एच. करोडपती, संचालिका मंगला करोडपती, सचिव डॉ.सचिन बडगुजर, संचालक डॉ.चेतन करोडपती, प्राचार्या स्वाती बलखंडे व शिक्षक, कर्मचारी वृंद उपस्थित होते.यावेळी संस्थाध्यक्ष यु.एच.करोडपती यांनी संविधानाबाबत विद्यार्थ्यांना माहिती देत सामाजिक समानतेचा संदेश दिला. सचिव डॉ.सचिन बडगुजर यांनी आंबेडकरांचे जीवन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. प्राचार्या स्वाती बलखंडे यांनी डॉ.आंबेडकरांचे जीवनकार्य व विचारांचा विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत परिचय करून दिला. मनिषा बाविस्कर यांनी आंबेडकरांचा संदेश शिक्षण, समानता व बंधुता यांचा अवलंब आपल्या जीवनात प्रत्येकाने करावा ही प्रेरणा विद्यार्थ्यांना दिली. सूत्रसंचालन किशोर महाजन यांनी केले.


